यूपीत मोठ्या विजयाचा भाजपचा दावा फुसका, जवळपास 45 टक्के उमेदवारांचं डिपॉजिट जप्त !

यूपीत मोठ्या विजयाचा भाजपचा दावा फुसका, जवळपास 45 टक्के उमेदवारांचं डिपॉजिट जप्त !

लखनऊ – भाजपच्या नेत्यांनी आणि त्यांनी माध्यमांना पुरवलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपच्या विजयाचा मोठा गवगवा करण्यात आला होता. मात्र टाईम्स ऑफ इंडियानं केलेल्या विश्लेषणानुसार भाजपच्या मोठ्या विजयाच्या दाव्याचा फुगा फुटला आहे. भाजपनं उभा केलेल्या जागांपैकी जवळपास 45 टक्के उमेदवारांचं डिपॉजिट जप्त झालं आहे.

उत्तर प्रदेशात महानगर पालिका, नगर पालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यामध्ये एकूण जागा या 12 हजार 644 जागा होत्या. त्यापैकी भाजपने सर्वाधिक म्हणज्ये 8 हजार 38 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. त्यापैकी भाजपच्या  3 हजार 656 उमेदवारांचं डिपॉजिट जप्त झालं आहे. तर भाजपच्या विजयी झालेल्या उमेदवारांची एकूण संख्या 2 हजार 366 एवढी आहे.

भाजपला या निवडणुकीत एकूण 30 टक्के मते मिळाली. मात्र भाजपाने केवळ मोठ्या शहरांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. नगरपंचायतीमध्ये मात्र भाजपला केवळ 11 टक्के मते मिळाली आहे. नगर पंचायतीमध्ये भाजपने 664 जागा जिंकल्या आहेत. तर 1462 जागांवर भाजपच्या उमेदावारांचे डिपॉजिट जप्त झाले आहे. टाईम्स ऑफ इंडियानं हे वृत्त दिलं आहे. त्याची लिंक खाली दिली आहे.

https://timesofindia.indiatimes.com/india/almost-half-of-bjp-candidates-in-up-civic-polls-lost-their-deposits/articleshow/61939959.cms

COMMENTS