मुंबई – विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं तिकीट नाकारल्यानंतर भाजप नेते विनोद तावडे हे पहिल्यांदा पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते मोठा निर्णय घेणार असल्याची माहिती आहे. भाजपने आपली चौथी यादी जाहीर केली परंतु या.यादीतही विनोद तावडे यांना उमेदवारी देण्यात आली नाही. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा असून पत्रकार परिषद घेऊन ते आपली बाजू मांडणार आहेत. दरम्यान, विनोद तावडे यांना विधान परिषदेवर पाठविण्यात येणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.
भाजपनं काल उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीतही ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, उच्चशिक्षण आणिसांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, प्रकाश मेहता यांचं नाव नाही. मुक्ताईनगर मतदारसंघातून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं तिकीट कापत त्यांची कन्या रोहिनी खडसे यांना उमेदवारी दिली आहे. चौथ्या यादीमध्येही नाव नसल्यामुळे विनोद तावडे हे पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडणार आहेत. त्यामुळे विनोद तावडे काय बोलणार याकडे लक्ष लागलं आहे.
COMMENTS