कश्मीरमध्ये प्रथमच भाजप युवा मोर्चाने रविवारी (22 ऑक्टोबर) संमेलनचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात “अल्लाहु अकबर” चे नारे देण्यात आले. माजी प्रधान मंत्री अटलबिहारी वाजपेयी यांनी दिलेला “इंसानियत, जम्हूरियत आणि कश्मीरियत” त्रिसूत्रीनुसारच काश्मिर प्रश्न सोडवला पाहिजे असंही स्पष्ट करण्यात आलं.
श्रीनगरच्या शेर-ए-कश्मीर क्रिकेट स्टेडियममध्ये जवळजवळ एक हजार महिला आणि पुरुष यावेळी उपस्थित होते. हा एक ऐतिहासिक कार्यक्रम आहे असे भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष पूनम महाजन यांनी यावेळी म्हणाल्या. ” जेव्हा मला सांगितले की बीजेपी युवा मोर्चाचा कश्मीरमध्ये माझे पहिले संमेलन आहे तेव्हा मी थोडी नर्वस होती. मी बॉलीवूड नगरीतून येते, त्यामुळे आता फक्त एवढ सांगते ‘ये तो बस ट्रेलर है, अभी पूरी सुपरहिट फिल्म बाकी है. असं महाजन म्हणाल्या. “अल्लाहु अकबर” आणि “बीजेपी जिंदाबाद” चे नारे देत पूनम महाजनचे स्वागत करण्यात आले.
COMMENTS