विधान परिषदेसाठी भाजपचा उमेदवार आज रात्री ठरणार, कोअर कमिटी तीन नावातून करणार एक नाव निश्चित !

विधान परिषदेसाठी भाजपचा उमेदवार आज रात्री ठरणार, कोअर कमिटी तीन नावातून करणार एक नाव निश्चित !

मुंबई – भाजपच्या कोअर कमिटीची आज रात्री महत्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत विधान परिषदेच्या एका जागेसाठीचा उमेदवार निश्चित केला जाणार आहे. मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, शायना एन सी यांच्यासह कोकणातील माजी आमदार प्रमोद जठार यांचं नाव चर्चेत आलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. निश्चित झालेलं नाव शिवसेनेला कळवलं जाणार आहे.

नारायण राणे यांना भाजपनं उमेदवारी दिली तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवेसना एकत्र येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गुजरात निवडणुकीच्या तोंडावर पराभव होणे भाजपला परवडणार नाही. त्यामुळे नारायण राणे यांचं नाव आता मागे पडल्याचं चित्र आहे. त्यामुळे भाजप पक्षातील एखाद्या नेत्याला उमेदवारी देण्याच्या विचारात आहे. भाजपकडून तीन नावांची सध्या चर्चा आहे.

भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, पक्षाच्या नेत्या शायना एनसी यांच्यासह आता आता कोकणातील माजी आमदार प्रमोद जठार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. या तीन नावातून निवड करताना शिवसेनेला कोणते नाव मान्य होईल याचाही विचार भाजपला करावा लागणार आहे. त्यासाठी आज सकाळी महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याची चर्चा आहे.

माधव भांडारी यांनी वेळोवेळी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे शिवसेनेचा त्यांच्या नावाला विरोध असले असंही बोललं जातंय. शायना एनसी यांचं नाव उमेदवारीसाठी चर्चेलं जात आहे. मातोश्रीसोबत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाला शिवेसनेकडून पसंती मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर प्रमोद जठार यांचंही नाव चर्चेत आहे. जठार  ज्या मतदारसंघातून विधानसभा लढले होते. तिथे नितीश राणे निवडूण आले आहेत. त्यामुळे आता 2019 मध्ये नितेश यांच्यासाठी ही जागा सोडावी लागणार आहे. तो विचार करुन तसेच जिल्ह्या सर्वकाही राणेंना दिले नाही असा संदेश जावा यासाठी जठारांचं नाव पुढे आल्याची चर्चा आहे.

COMMENTS