देवेंद्र फडणवीस यांच्यावर पक्ष सोपवणार आणखी एक मोठी जबाबदारी ?

देवेंद्र फडणवीस यांच्यावर पक्ष सोपवणार आणखी एक मोठी जबाबदारी ?

मुंबई – राज्यातील विधानसभेचे विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर पक्षाकडून आणखी एक मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. बिहार विधानसभा निवडणूक जवळ आली असून या निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस यांना भाजपकडून प्रभारीपद देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे
बिहारमध्ये भाजपचे विद्यमान प्रभारी भूपेंद्र यादव यांच्यासोबत फडणवीस काम पाहणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान बिहार विधानसभा निवडणुकीला 21 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिहार विधानसभेची निवडणूक लांबणीवर टाकण्याची मागणी बिहारमधील राष्ट्रीय जनता दल आणि लोकजनशक्ती पक्षासह इतर राजकीय पक्षांनी आयोगाकडे केली होती. परंतु ही मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी  बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक वेळेवरच घेतली जाईल याचा पुनरुच्चार केला आहे. तसेच निवडणूक आयोग कोरोना विषाणूची परिस्थिती नजरेसमोर ठेवून तयारी करीत आहे व ती करताना आवश्यक ती खबरदारीही घेतली जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये होत असलेल्या निवडणुकीत सुरक्षेच्या दृष्टीने सर्व प्रकारची तयारी करण्यात येत आहे. निवडणूक आयोगाने या निवडणुकीबाबत सविस्तर सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये मतदान केंद्रावर सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यापासून इतर अनेक गोष्टींचा समावेश आहे.

COMMENTS