भाजपचे के.जी. बोपय्या कर्नाटक विधानसभेचे हंगामी अध्यक्ष !

भाजपचे के.जी. बोपय्या कर्नाटक विधानसभेचे हंगामी अध्यक्ष !

नवी दिल्ली  सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर कर्नाटकमध्ये विराजपेठ मतदार संघातील भाजपचे आमदार के जी बोपय्या यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच उद्या फ्लोअर टेस्टही बोपय्याचं घेणार असल्याची माहिती असून राज्यपाल वजुभाई वाला यांनी बोपय्या यांना हंगामी अध्यक्षपदाची शपथ दिली आहे. बोपय्या मागच्या वेळी भाजप सरकारमध्ये कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष होते.

दरम्यान के. जी. बोपय्या यांच्या निवडीला काँग्रेसनं जोरदार आक्षेप घेतला असून ‘कायदेशीर बाबी तपासून मग आपण यावर भूमिका मांडू असं काँग्रेसनं म्हटलं आहे. या मुद्यावर आम्ही कोर्टात जाऊ शकतो असं बोपय्या यांनी म्हटलं आहे.

 

 

COMMENTS