नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीत बाजी मारण्यासाठी सर्वच पक्षांमध्ये आतापासूनच जोरदार चुरस रंगली आहे. काँग्रेस आणि भाजपनं तर आतापासूनच एकमेकांचे गड कोरण्यास सुरुवात केली आहे. दक्षिण भारतातील चार राज्यात काँग्रेसची मोठ्याप्रमाणात ताकद आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू आणि पाँडेचरीमध्ये काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी 2004 मध्ये सर्वात जास्त जागा जिंकल्या आहेत. या चारही ठिकाणच्या 82 जागांवर आगामी निवडणूक जिंकण्यासाठी युपीए आणि एनडीएकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे.
दरम्यान या चारही राज्यात 2004 आणि 2009 मध्ये काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी 70 जागांवर विजय मिळवला होता. या सर्व राज्यांपैकी तमिळनाडूवर दोन्ही पक्षांची जास्त नजर पहावयास मिळत आहे. जयललिता आणि करुणानिधी यांच्या निधनामुळे याठिकाणी कोणत्या पक्षाला जास्त जागा मिळतील याचा अंदाज सध्या तरी मांडता येत नाही. त्यामुळे या राज्यात दोन्ही पक्षांकडून सावधानतेची भूमिका घेतली जात असून दुधासोबत ताकही फुकून घेतले जात आहे. एकूणच दक्षिण भारतातील या राज्यात भाजपकडून निकराचे प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे या प्रयत्नांनंतर याठिकाणी भाजपला कितपत यश मिळणार हे पाहणं गरजेचं ठरणार आहे.
COMMENTS