मी कमरेखालचे बोलतो, मात्र तुम्ही कमरेखालचे करता ते गेले का खड्ड्यात?, भाजप आमदाराची गिरीश महाजनांवर जोरदार टीका !

मी कमरेखालचे बोलतो, मात्र तुम्ही कमरेखालचे करता ते गेले का खड्ड्यात?, भाजप आमदाराची गिरीश महाजनांवर जोरदार टीका !

मुंबई – भाजपच्या आमदारानं भाजपच्या पदाधिका-यांना घरचा आहेर दिला आहे. ते तर हायब्रीड बीजेपीवाले, डांबरचोर, डंपरचोर, मोबाइलचोरांची भरती असल्याची जोरदार टीका भाजपच्या पदाधिका-यांवर करण्यात आली आहे. भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी ही टीका केली आहे. तसेच धुळे शहराचा आगामी महापोर मीच आहे, अशी घोषणा देखील आमदार अनिल गोटे यांनी केली आहे. भाजपच्या नेतृत्वाला थेट आव्हान देत आमदार गोटे यांनी बंडाचा झेंडा उभारला आहे. ते धुळ्यातील मेळाव्यात बोलत होते.

 

दरम्यान यावेळी बोलत असताना गोटे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावरही टीका केली आहे. मी बोललो तर म्हणे तुम्ही कमरेखालचे बोलता, मात्र महाजन तुम्ही कमरेखालचे करता, ते गेले का खड्ड्यात?, असा प्रश्नही गोटे यांनी केला आहे. त्याचबरोबर बोलताना डास डोळ्यासमोर आल्यावर ते म्हणाले डांसबारवाले ते दुसरे. ते तिकडे आहेत. त्यांच्या सीडीचे पुरावेच माझ्याकडे आहेत. जास्त नादाला लागू नका, अन्यथा सगळी चिरफाड करेन, असा इशाराही गोटे यांनी या वेळी भाजपातील पदाधिकाऱ्यांना दिला आहे. रविवारी शिवतीर्थावर अामदार गाेटे यांनी भाजपचा मेळावा घेतला.

दरम्यान भाजपच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी गोटे यांना बोलू दिले नव्हते. त्याचा संताप या मेळाव्यात दिसून आला. आमचा स्वाभिमानी भाजप नाही. तर प्युअर भाजप आहे. गाई, गो-हेवाले तिकडे आहेत. त्यांचा हायब्रीड भाजप आहे. सगळे राष्ट्रवादीतील गुंड, पुंडांची भरती झाली असून डांबरचोर देवा सोनार, महापालिकेच्या तिजोरीला भोक पाडणारा नंदू सोनार, त्याचबरोबर डंपरचोर, मोबाईलचोर सगळे तिकडे आहेत. शहराच्या विकासासाठी सगळे प्रयत्न चालले आहेत. अशी जोरदार टीकाही अनिल गोटे यांनी केली आहे.

 

COMMENTS