मुंबई – नुकतीच मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या तीन मंत्र्यांच्या अडचणीत वाढ झाली असल्याचं दिसत आहे. कारण मुंबई उच्च न्यायालयाने राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर आणि अविनाश महातेकर यांना नोटीस पाठवली आहे. या तीनही मंत्र्यांच्या मंत्रिपदावर आक्षेप घेण्यात आला होता. मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिकेद्वारे त्यांना आव्हान देण्यात आले आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना नोटीस पाठवली आहे.
दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर यांसारख्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना फोडाफोडी करून सहा महिन्यांसाठी त्यांना मंत्रिपद देणे हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला राजकीय भ्रष्टाचार आहे. असा आरोप काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. तर रिपाइंचे अविनाश महातेकर हे निवडून आलेले नाहीत. तरीही त्यांना मंत्रिपद देण्यात आले असून ते निवडून येणे आवश्यक आहे. सहा महिन्यांत ते कसे शक्य आहे, असा प्रश्नही चव्हाण यांनी उपस्थित केला होता. याबाबत मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिकेद्वारे त्यांना आव्हान देण्यात आले आहे. सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना नोटीस पाठवली आहे. यामध्ये न्यायालयाने त्यांना उत्तर देण्यासाठी चार आठवड्यांचा अवधी दिला आहे.
COMMENTS