नवी दिल्ली – एका जवानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामध्ये तो 50 कोटी दिले तर मी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही मारु शकतो असं म्हणत आहे. हा व्हिडीओ बीएसएफचा निलंबित जवान तेजबहादूर यादव याचा असल्याचं बोललं जात आहे. मला 50 कोटी रुपये दिले तर मी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही मारु शकतो, असं या व्हिडीओ क्लिपमध्ये तो बोलताना दिसतोय. हा दोन वर्षांपूर्वीचा व्हिडीओ असल्याचं बोललं जात आहे.
This is the man MahaGathBandhan pit against @narendramodi – He allegedly wants to have Modi killed! Recently PM alluded to this! If this is true, I'm shocked at the lack of outrage & media attention! Should there not be a probe into the veracity if video & conspiracy if any pic.twitter.com/1Coiz46TzX
— Shehzad Jai Hind (@Shehzad_Ind) May 6, 2019
दरम्यान मित्रांसोबत गप्पा मारताना थेट पंतप्रधानांना मारण्याच्या गप्पा केल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
यामध्ये हा व्यक्ती आपल्या मित्रासोबत बोलत असल्याचं दिसत आहे. मला 50 कोटी रुपये दिले तर मी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही मारु शकतो, असं या व्हिडीओ क्लिपमध्ये तो बोलताना दिसतोय. परंतु हे माझ्याविरोधात षडयंत्र रचलं असल्याचा दावा तेजबहादूरने केला आहे.
COMMENTS