उत्तर प्रदेश – युपीमध्ये मायावतींना त्यांच्याच पक्षातील आमदारानं धक्का दिला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत बसपा आमदार अनिल सिंह यांनी भाजपाच्या उमेदवाराला मतदान केलं आहे. मतदान करुन आल्यानंतर अनिल सिंह यांनी आपण भाजपच्या उमेदवाराला मतदान केलं असल्याचं म्हटलं आहे. उत्तर प्रदेशातील १० राज्यसभा जागांपैकी ८ जागांवर भाजपाच्या उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे. राज्यातील आमदारांची संख्या पाहता एका जागेवर समाजवादी पार्टीचा उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत सपाने बसपाला पाठिंबा दिला आहे.
I have voted for BJP, I don't know about the rest: Anil Singh, BSP MLA #RajyaSabhaElections pic.twitter.com/28R7njmfnP
— ANI UP (@ANINewsUP) March 23, 2018
दरम्यान यापूर्वी बसापाच्या महिला आमदार वंदना सिंह यांनी देखील क्रॉस वोटिंग केल्याची बातमी होती. मात्र, वंदना सिंह यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. तसेच मी आमच्या पक्षाच्या बाजूने असून क्रॉस वोटिंगची अफवा पसरवली जात असल्याचा आरोपही वंदना सिंह यांनी केला आहे.
COMMENTS