नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा 2019-20 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांच्या हाती फार काही लागलं नसल्याचं दिसत आहे. सरकारने मध्यमवर्गींयांना करात कुठलीही नवी सूट दिली नाही. तर श्रीमंतांना मात्र मोदी सरकारने कर लावला आहे. शिवाय इंधन आणि सोन्यावर कर लावून महागाईला निमंत्रण देण्याचा प्रयत्न सरकारनं केला आहे.
काय स्वस्त, काय महाग?
महाग–
पेट्रोल आणि डिझेल महागणार, प्रत्येकी 1 रुपयाचा अतिरिक्त सेस
सोने आणि मौल्यवान धातूंही महागले, उत्पादन शुल्क 10 टक्क्यांवरुन 12.5 टक्के
तंबाखूजन्य पदार्थ – गुटखा, सिगरेट, तंबाखू या तंबाखूजन्य पदार्थांवर अतिरिक्त आकारण्यात येणार
पुस्तके – पदेशातून येणाऱ्या पुस्तकांवरील कर वाढवल्याने किंमत वाढणार
काजू
साबणासाठी वापरली जाणारी तेलं
प्लास्टिक
रबर
एसी
सीसीटीव्ही कॅमेरा
लाऊड स्पीकर
इम्पोर्टेड फर्निचर
वाहनांच्या चेसिज
पुस्तकं, वृत्तपत्रांचा कागद
टाईल्स
काय स्वस्त ?
इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीसाठी प्रोत्साहन, करामध्ये दीड लाखांची सूट
सेट टॉप बॉक्स
मोबाईल फोनचे चार्जर
मोबाईल फोनच्या बॅटरी
नाफ्ता
विमा स्वस्त होणार
COMMENTS