नवी दिल्ली – अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अनुपस्थितीत त्यांचा पदभार सांभाळणारे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल संसदेसमोर अर्थसंकल्प सादर करत आहेत. यादरम्यान त्यांनी देशभरातील शेतक-यांसाठी मोठी घोषणा केली आहे. 2 हेक्टरपर्यंत जमीन आसणा-या छोट्या शेतक-यांना वर्षातून 6 हजार रुपये देण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतला आहे. तीन टप्प्यातून दोन-दोन हजार रुपयांची मदत थेट शेतक-यांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे. याचा फायदा देशातील 18 कोटी शेतक-यांना होणार असल्याची माहिती पीयूष गोयल यांनी दिली आहे.
याचबरोबर आजच्या अर्थसंकल्पात औषधं आणि उपकरणांच्या किंमती कमी केल्या आहेत. गरीब आणि श्रीमंतांमधली दरी कमी करण्यासाठी स्वस्त धान्यासाठी १ लाख ७० हजार करोडची घोषणा पियूष गोयल यांनी केली आहे. तसेच गावांमध्येही शहरासारख्याच योजना उपलब्ध करून देणार असल्याचंही यावेळी पियूष गोयल यांनी म्हटलं आहे.
COMMENTS