देशभरातील चार लोकसभा आणि विधानसभेच्या 10 जागांसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. पालघरमध्ये चौथ्या फेरीअखेर भाजपचे राजेंद्र गावित यांना आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत गावित यांना 35000, बविआचे बळीराम जाधव यांना 30000 तर शिवसेनेचे श्रीनिवास वनगा यांना 26000 मते मिळाली आहेत. काँग्रेसचे शिंगडा यांना 9000 आणि इतरांना 12131 मते मिळाली आहेत. तर उत्तर प्रदेशातील कैरानामध्ये राष्ट्रीय लोक दलाचे हुसेन हे आघाडीवर आहेत. हुसेन यांना सपा, बसपा आणि काँग्रेस या पक्षांचा पाठिंबा आहे. भाजपचे खासदार हुकुमसिंग यांच्या निधनामुळे या ठिकाणी मतदान होत आहे.
लोकसभेच्या चार जांगावरील पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. या चारही जागा यापूर्वी भाजपकडे होत्या. त्यामुळे त्या सर्व जागा राखण्याचं मोठं आव्हान भाजपपुढे आहे. महाराष्ट्रातील भंडारा गोंदिया आणि पालघर, उत्तर प्रदेशातील कैराना आणि नागालँडमधील एक जागेचा या मध्ये समावेश आहे. गेल्या चार वर्षात झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपचा मोठा पराभव झाला आहे. त्यामुळे 2014 मध्ये भाजपकडे असलेल्या 282 खासदारांची संख्या 272 वर आली आहे.
COMMENTS