विदर्भाच्या गडात भाजपला धक्का, भंडारा गोंदियातून राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे विजयी !

विदर्भाच्या गडात भाजपला धक्का, भंडारा गोंदियातून राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे विजयी !

भंडारा – भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपला जोरदार धक्का बसला आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मधुकर कुकडे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे हेमंत पटले यांना पराभूत केलं आहे. मधुकर कुकडे हे सुमारे 40 हजार मतांनी विजयी झाले आहेत. मधुकर कुकडे यांना सुमारे 2 लाख 83 हजार  मते मिळली आहेत. तर भाजपचे हेमंत पटले यांना सुमारे 2 लाख 43 हजार मते मिळाली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. भाजपनं मोठी ताकद या मतदारसंघात लावली होती. मात्र त्यांना पराभवाची चव चाखावी लागली आहे. मतदारांच्या ट्रेंडनुसार कुणबी समाजाची मते मोठ्या प्रमाणात कुकडे यांना मिळाली तर पटले यांना पोवार समाजाची मते मिळाली आहेत.

2014 मध्ये ही जागा भाजपच्या तिकीटावर नाना पटोले यांनी मोठ्या फरकाने जिंकली होती. मात्र शेती आणि शेतक-यांच्या प्रश्नावर मोदी सरकारविरोधात बंड करुन नाना पटोले यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे ही पोटनिवडणुक लागली होती. नाना पटोल यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

COMMENTS