मुंबई – पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणात एकनाथ खडसे यांना क्लिन चीट मिळाली आहे. त्यानंतर एकनाथ खडसे यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं जाणार असल्याची चर्चा आहे. परंतु मंत्रिमंडळात परतण्याची अजिबात इच्छा नसल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. तसचे मी भाजप सोडणार नसून भाजप मला माझ्या फॅमिलीसारखी आहे. भाजपमध्येच मी राजकीयदृष्ट्या लहानाचा मोठा झालो. त्यामुळे हा पक्ष माझं कुटुंब आहे. अडचणीच्या काळात भाजपनेच मला आधार दिला. त्यामुळे भाजप सोडण्याचा प्रश्नच नाही, असंही खडसेंनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढील वर्षी विधानसभा निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे आता मंत्री होऊन काय करणार, वर्षभरात कुठे ना कुठे निवडणुका होत आहेतच. त्यामुळे आचारसंहिता लागणार. जरी मंत्री झालो तरी कामं करायलाच मिळणार नाही. त्यापेक्षा मंत्रिमंडळात न गेलेलंच बरं असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
COMMENTS