मुंबई – राज्याचं लक्ष लागलेल्या महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळी विस्ताराची तारीख अखेर ठरली आहे. येत्या 30 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या विल्तारात उपमुख्यमंत्रिपद आणि महत्त्वाचे नेते मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. उपमुख्यमंत्रीपदी राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
हा शपथविधी सोहळा विधिमंडळाच्या प्रांगणात होणार आहे. ज्या प्रकारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शिवाजीपार्कवर शपथविधी सोहळा पार पडला होता. त्या प्रमाणे जनसमुदायच्या उपस्थितीत हा सोहळा करण्याच्या हालचाल सुरू आहे. त्यामुळे या विस्ताराकडे लक्ष लागलं आहे.
काँग्रेसच्या यादीला उशीर
महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद भूषवलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांची नावं मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. मात्र कुणाला मंत्रिपद द्यायचं याबाबत चर्चा सुरु आहे. दिल्ली हायकमांडने पृथ्वीराज चव्हाणांच्या नावावर फुली मारुन, अशोक चव्हाणांच्या डोक्यावर हात ठेवल्याचं कळतंय. तर विदर्भात यशोमती ठाकूर ,अमित झनक की सुनील केदार तर पश्चिम महाराष्ट्रात सतेज पाटील की विश्वजित कदम असा पेच काँग्रेससमोर आहेत. मुंबईतही अमिन पटेल की अस्लम शेख आणि विजय वडेट्टीवार की अमित देशमुख यांचा समावेश मंत्रिमंडळात करायचा याचा निर्णय झाला नसल्याने काँग्रेसच्या यादीला उशीर होत असल्याची चर्चा आहे.
COMMENTS