मुंबई – आज राज्य मंत्रिमंडळाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, ते खालील प्रमाणे…
- नागरी भागातील सांडपाणी प्रक्रिया पुनर्चक्रीकरण व पुनर्वापर धोरण निश्चित.
- परसातील कुक्कुटपालनास चालना देण्यासाठी राज्यातील 302 तालुक्यांत सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर सघन कुक्कुट विकास गटाची स्थापना.
- महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम 125 मधील कारखान्यांनी ठोक रकमेच्या स्वरुपात अंशदान देण्याबाबतची तरतूद वगळण्याचा निर्णय.
- नाशिक जिल्ह्यातील उर्ध्व गोदावरी प्रकल्पाच्या 918 कोटी किंमतीस तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता.
- मौजा धंतोली येथील जमिनीवर असलेल्या खेळाच्या मैदानाच्या आरक्षणात फेरबदल करून त्याचा नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी वाणिज्य वापर करण्यास मंजुरी.
- जिल्हा विधी सेवा प्राधिकरणासाठी 18 जिल्ह्यांत दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर संवर्गातील पूर्णवेळ सचिव पद निर्माण करण्यास मान्यता.
- महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) नियम-2013 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता.
COMMENTS