मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत होम क्वारंटाईन असलेले सामाजिक व न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी परळी वैजनाथ येथील घरूनच व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते. याबाबत मुंडे यांनी ट्वीट केलं असून
कोरोना आजारावर मात करून रुग्णालयातून डिस्चार्ज तर मिळाला मात्र पुढील काही दिवसांसाठी होम क्वारंटाईन रहावे लागणार आहे. असे असले तरी कामं थांबवून कसे चालेल. म्हणून आज परळी वैजनाथ येथील घरूनच व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी झालो असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय!
1.महाराष्ट्र राज्य व्यवसाय,व्यापार,आजिविका व नोक-या यावरील कर अधिनियम, १९७५ यामध्ये सुधारणा करून महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजिविका व नोक-या यावरील कर(सुधारणा) अध्यादेश, २०२० प्रख्यापित करण्यास मंजुरी.
2.महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम, २०१७ मध्ये सुधारणा करून महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (व्दितीय सुधारणा) अध्यादेश, २०२० प्रख्यापित करण्यास मंजुरी.
3.रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग योजना सुरू करण्यास मान्यता. फलोत्पादन शेतकऱ्यांना होणार लाभ.
4.हंगाम २०१९-२० मध्ये हमी भावाने खरेदी केलेल्या कापसाचे शेतक-यांचे चुकारा अदा करण्यासाठी बँकांकडून नजरगहाण कर्ज घेण्यास कापूस पणन महासंघाला शासन हमी देण्यास मान्यता.
5.माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण – २०१५ ला नवीन धोरण अस्तित्वात येईपर्यंत देण्यात आली मुदतवाढ.
6.कोविड-१९ च्या पश्चात उद्योग वाढीसाठी राज्य शासनाची गतिमान पाऊले. उद्योगांना आकर्षित करण्यासाठी उपाययोजनांची आखणी.
7.राज्याचे बीच शॅक धोरण तयार करण्यास मंजुरी.समुद्रकिनारी पर्यटकांना विविध सुविधा उपलब्ध होणार.
8.नागपूर-नागभिड या नॅरोगेज रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज रेल्वे मार्गात रुपांतर करण्याकरिता राज्य शासनाचा सहभाग देण्यास मान्यता.
9.आशा स्वयंसेविकांच्या आणि गट प्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ.राज्यातील आशा स्वयंसेविकांना मोठा दिलासा.
10. एमटीडीसी जमिनीचा खासगीकरणातून विकास करणार
11 गव्हासाठी विकेंद्रीत खरेदी योजना
12. कोस्टल गुजरात बरोबर वीज खरेदी करार मान्यता
COMMENTS