आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय !

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय !

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत आरोग्य सेवा संचालनालयांतर्गत वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ या संवर्गातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे एमपीएससी मधून वगळून निवड मंडळामार्फत भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबरोबरच इतरही काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ते खालीलप्रमाणे…

 

1 ) पालिका आणि ग्रामपंचायतींमध्ये राखीव जागांवर निवडणूक लढविण्यास इच्छुकांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी देण्यात आलेली सहा महिन्यांची मुदत आता बारा महिने करण्याचा निर्णय.

2) शहरी महानेट आणि राज्यात ई-शासन सेवा वितरण करण्यास मंजुरी.

3 ) व्यापार करण्यास सुलभता धोरणानुसार महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अध‍िन‍ियम-2002 अंतर्गत ऐच्छिक नोंदणी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून अनामत रक्कम घेण्याची तरतूद रद्द.

4 ) अकोला जिल्ह्याच्या खारपाण पट्ट्यातील कारंजा रमजानपूर (संग्राहक) बृहत लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या 211.15 कोटी किंमतीस प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता.

5 ) अकोला जिल्ह्याच्या तेल्हारा तालुक्यातील पूर्णा बॅरेज-2 (नेर धामणा) मध्यम प्रकल्पाच्या 888.81 कोटी किंमतीस द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता.

6 ) पुणे जिल्ह्यातील कुकडी पाटबंधारे प्रकल्पाच्या 3948.17 कोटी किंमतीस तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता.

7 ) केंद्र शासन पुरस्कृत योजनेंतर्गत महानिर्मितीच्या कोराडी तलावाचे संवर्धन करण्यास प्रशासकीय मान्यता.

8 ) आरोग्य सेवा संचालनालयांतर्गत वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ या संवर्गातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे एमपीएससी मधून वगळून निवड मंडळामार्फत भरण्याचा निर्णय.

COMMENTS