मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
- महाराष्ट्र औद्योगिक धोरण-2013 अंतर्गत एकात्मिक औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यासंबंधीच्या धोरणामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय.
- एकात्मिक औद्योगिक क्षेत्रात सवलती देण्याचा निर्णय.
- अपंग व्यक्ती, वरिष्ठ नागरिक व समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी 11 ठिकाणी विशेष न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय.
- मुंबई येथे मराठी भाषा भवनाच्या उभारणीसाठी समिती स्थापण्याचा निर्णय.
- महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रपटाची नामांकित संस्थेकडून निर्मिती करण्याचा निर्णय.
- राज्यातील मंजूर योजनांच्या क्षेत्रात एकात्मिकृत नगरवसाहत प्रकल्प विकसित करण्यासाठी मंजूर विनियमामधील काही तरतुदींमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय.
- महर्षी वेदोध्दारक फाऊंडेशन आणि महर्षी वेदिक हेल्थ प्रा.लि. यांच्या एकात्मिक अतिविशाल प्रकल्पाला प्रायोगिक तत्त्वावर मान्यता.
- महाराष्ट्र शासकीय गट अ आणि गट ब (राजपत्रित व अराजपत्रित) पदांवर सरळसेवेने व पदोन्नतीने नियुक्तीसाठी महसुली विभाग वाटप नियम-2015 मध्ये सुधारणा.
- रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यासह त्यासाठी आवश्यक पदनिर्मिती करण्यास मान्यता.
COMMENTS