केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वपूर्ण बैठक !

केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वपूर्ण बैठक !

नवी दिल्ली  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाची आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. या बैठकीत सरकार कठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरणावर मोठा निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच सरकार पॉक्सो कायद्यात बदल करण्याचा निर्णय घेणार असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान या बैठकीत पॉक्सो कायद्यात बदल करण्याचा निर्णय झाला तर 12 वर्षाखालील चिमुरडींवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा होऊ शकते. सध्या पॉक्सो कायद्यात दोषीला कमीत कमी 7 वर्ष ते आजीवन कारावासाची शिक्षा होते. आज कॅबिनेटच्या बैठकीत ऍट्रॉसीटी कायद्याबाबत ही सरकार काही महत्त्वाचे निर्णय घेणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या महत्त्वपूर्ण बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

COMMENTS