राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार, या मंत्र्याची होणार उचलबांगडी ?

राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार, या मंत्र्याची होणार उचलबांगडी ?

मुंबई – राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत दिल्ली दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत जवळपास दीड तास बंद दाराआड चर्चा केली असल्याची माहिती आहे.  एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाचा पहिला आणि अखेरचा विस्तार होणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच या मंत्रिमंडळ विस्तारात गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांची मंत्रिमंडळातून उचलबांगडी होणार असल्याचं बोललं जात असून चार नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं जाणार आहे.

दरम्यान एसआरए घोटाळ्यामुळे बदनाम झालेले गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांची उचलबांगडी केली जाणार असल्याची माहिती आहे. प्रकाश मेहता यांना घरी बसवून राज्यातील सरकारची प्रतिमा धुवून काढण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाणार असल्याचं यावरुन दिसत आहे. प्रकाश मेहता यांनी एसआरए घोटाळ्याबाबत मुख्यमंत्र्यांना अवगत असल्याचा शेरा दिला होता, मात्र विधानसभेतच मुख्यमंत्र्यांनी हा दावा फेटाळल्यामुळे लोकायुक्तांमार्फत या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. त्यामुळे मेहतांना बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

COMMENTS