नवी दिल्ली – डेटा लीक प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या ब्रिटन कंपनीबाबत धक्कादायक माहिती समोर आली असून केम्ब्रिज अॅनालिटीका या कंपनीने २०१९ निवडणुकीसाठी काँग्रेससमोर प्रस्ताव ठेवला होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. केम्ब्रिज अॅनालिटीकाने फेसबूक आणि ट्विट्समधील डेटा चोरी करत २०१९ निवडणुकीवर प्रभाव टाकू शकतो असा दावा काँग्रेससमोर ठेवलेल्या प्रस्तावात केला होता. या कॅम्पेसनाठी काँग्रेसला २.५ कोटींचा खर्च येईल असंही सांगण्यात आलं होतं. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसने बैठक पार पडली मात्र कंपनीसोबत कोणताही करार करण्यात आला नाही असं वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.
दरम्यान मागच्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये केम्ब्रिज अॅनालिटीकाने हा प्रस्ताव मांडला होता. ऑगस्ट २०१७ मध्ये मांडण्यात आलेल्या ५० पानांच्या या प्रस्तावाला ‘डेटा ड्रिव्हन कॅम्पेन | द पाथ २०१९ लोकसभा’ असं नाव देण्यात आलं असल्याची माहिती आहे. परंतु ‘एखाद्या कंपनीकडून व्यवसायिक प्रस्ताव आला याचा अर्थ आपोआप लगेच संबंधित कंपनी आणि ग्राहकात नातं निर्माण झालं असा होत नसल्याचं काँग्रेसच्या डेटा अॅनालिटिक्स विभागाचे प्रमुख प्रवीण चक्रवर्ती यांनी म्हटलं आहे.
COMMENTS