सोलापूर – जमीन विक्री प्रकरणी माजी खासदार आणि राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी खासदार संदिपान थोरात यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार बबनराव शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माढा येथील जगदंबा सूत गिरणी जमीन विक्री प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजित शिंदे यांचाही समावेश आहे.
राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे
दरम्यान सामाजिक कार्यकर्ते नागनाथ कदम यांनी माढा न्यायालयात त्यांच्याविरोधात अर्ज दाखल केला होता. त्यानंतर न्यायालयाने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून चौकशीचा अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. त्यानंतर या तिघांवर कलम 409, 420, 464, 465 आणि 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे माजी खासदार संदिपान थोरात यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार बबनराव शिंदे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली असल्याची दिसत आहे.
COMMENTS