नवी दिल्ली – सीबीएसई बोर्डातील दहावीची फेरपरीक्षा रद्द करण्यात आली आहे. याबाबतची माहिती केंद्रीय शालेय शिक्षण सचिव अनिल स्वरूप यांनी दिली आहे. दहावीच्या गणित विषयाबाबत केलेल्या घोषणेमुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दहावीच्या पेपरफुटीप्रकरणी तपास सुरू असून १५ दिवसांत फेरपरीक्षा घ्यायची अथवा नाही याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगत फेरपरीक्षा झाल्यास ती फक्त दिल्ली आणि हरियाणामध्येच होईल आणि ती जुलैमध्ये घेतली जाईल, असंही अनिल स्वरुप यांनी म्हटलं आहे.
दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेरपरीक्षेबाबत सरकारला इशारा दिला होता. तसेच त्यांनी सीबीएसीतील विद्यार्थ्यांचा पालकांना पत्र लिहून तुमच्या मुलांना फेरपरीक्षेत बसवू नका असं आवाहन केलं होतं. तसेच तुम्ही निर्णयावर ठाम रहा, सरकारला काय निर्णय घ्यायचा असेल तो घेऊ द्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना देशभरातील विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या पाठीशी ठाम उभी आहे, अशी ग्वाही राज ठाकरे यांनी पालकांना दिली होती.
COMMENTS