नवी दिल्ली – महाराष्ट्रातील दुष्काळी स्थिती पाहता केंद्र सरकारनं मदत जाहीर केली आहे. केंद्र सरकारने 4 हजार 500 कोटींची मदत जाहीर केली आहे. कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी मंगळवारी ही माहिती दिली.केंद्र सरकारने जाहीर केलेल्या या मदतीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषीमंत्री राधामोहन सिंह यांचे आभार मानले आहेत. केंद्राच्या या मदतीमुळे राज्यातील शेतकय्रांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान महाराष्ट्रासह केंद्राने अन्य 7 राज्यांना मदत दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय समितीने राज्यांना मदत देण्यासंदर्भातील निर्णय घेतला आहे. यामध्ये हिमाचल प्रदेशला 317.44 कोटी,उत्तर प्रदेश- 191.73 कोटी, आंध्र प्रदेशला 900.40 कोटी, गुजरातला 127.60 कोटी, कर्नाटक- 949.49 कोटी,महाराष्ट्र- 4 हजार 714.28 कोटी, पॉडेचरी- 13.09 कोटी अशी मदत देण्यात आली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी मात्र या मदतीबाबत शंका व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांना मदत देताना सरकारने हात आखडता घेतला असून प्रत्यक्षात यातली किती मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आणि कधी पोहोचणार हे महत्त्वाचं असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.
COMMENTS