आता एका केंद्रावर 1,400 मतदार करू शकतील मतदान!

आता एका केंद्रावर 1,400 मतदार करू शकतील मतदान!

नवी दिल्ली-  आता एका मतदान केंद्रावर फक्त 1,400 पेक्षा जास्त मतदारांना मतदान करता येणार नाही. मतदान प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी निवडणूक आयोगाने महत्वपूर्ण घोषणा केली आहे. वोटर वेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेलची क्षमता लक्षात घेता निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. एका वीवीपीएटी मधून 1,500 पेक्षा जास्त मतदान केल्याच्या पावत्या काढता येत नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

मतदाराने ईवीएम मशिनच्या आधारे मतदान केल्यानंतर वीवीपीएटीवरून एक पावती मिळेल त्यावरून समजेल की आपले मतदान झाले की नाही. ही पावती मतदान केंद्रातील एका डब्यात टाकण्यात येईल. ती पावती मतदाराला सोबत घेऊन जाता येणार नाही. ईवीएम मतदान संख्या आणि या पावत्यांची संख्या बरोबर आल्यावरच मतमोजणी सुरू होईल, यामुळे गैरप्रकार टळतील, असा दावा आयोगाने केला आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये सगळ्या 68 जागांसाठी वीवीपीएटी युक्त इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (ईवीएम)चा वापर करण्यात येणार आहे. यापुढे सर्व निवडणूकामध्ये हा बदल करण्यात येणार आहे.

 

COMMENTS