ब्रिटीश परंपरेला मोदी सरकारचा फाटा !

ब्रिटीश परंपरेला मोदी सरकारचा फाटा !

नवी दिल्ली – येत्या 29 जानेवारी ते 6 एप्रिलदरम्यान दोन टप्प्यात नव्या वर्षातील संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार असून केंद्रीय अर्थसंकल्प येत्या 1 फेब्रुवारी रोजी सादर केला जाणार आहे. याबाबतची माहिती केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार यांनी शुक्रवारी दिली आहे. दोन टप्प्यात यंदाचे संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार असून 29 जानेवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान पहिला टप्पा पार पडणार आहे. तर 5 मार्च ते 6 एप्रिल या काळात दुसरा टप्पात सुरु होणार आहे. आजपर्यंत ब्रिटिश परंपरेनुसार देशात फेब्रुवारीच्या अखेरीस अर्थसंकल्प सादर केला जात होता. परंतु या परंपरेला फाटा देत अर्थमंत्री अरुण जेटली हे एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

 

 

दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली येत्या 1 फेब्रुवारीला संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. येत्या 29 जानेवारीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सभागृहांना उद्देशून भाषण करणार आहेत. याचदिवशी संसदेत आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

COMMENTS