कंडोमच्या जाहिरातीबाबात सरकारचा मोठा निर्णय

कंडोमच्या जाहिरातीबाबात सरकारचा मोठा निर्णय

दिल्ली : टीव्हीवर दाखवल्या जाणा-या कंडोमच्या जाहिरातीबाबत केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. या जाहिराती दाखवण्यासाठी सरकारनं वेळ ठरवून दिली आहे. ठरवून दिलेल्या वेळेतच माध्यमांनी या जाहिराती दाखवाव्यात असा आदेश देखील देण्यात आला आहे. सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत या जाहिराती दाखवू नका असा आदेश केंद्र सरकारनं दिला आहे. अशा जाहिराती एका विशिष्ट वयोगटासाठी असून लहान मुलांसाठी त्या निरुपयोगी आहेत. त्यामुळे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.

लहान मुलांना हानिकारक गोष्टींविषयी रुची नर्माण करणाऱ्या जाहिरातींना परवानगी देण्यात येऊ नये, या नियमाअंतर्गत हा आदेश देण्यात आला आहे. गर्भ निरोधक आणि एड्स नियंत्रणासाठी सरकारकडूनही कंडोमचा प्रचार केला जातो. बॉलिवूडचे अनेक कलाकारही कंडोमच्या जाहिराती करतात.

 

 

COMMENTS