नवी दिल्ली – चालू आर्थिक वर्षातील रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीबाबत केंद्र सरकारनं एतिहासिक निर्णय घेतला आहे. किमान आदारभूत किंमतीत मोठी वाढ करण्यात आली असून त्यामुळे शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गहू, हरभरा, मोहरी, मसूर यांच्या आधारभूत किंमतीत वाढ करण्यात आली असून आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारनं घेतलेल्या या निर्णयामुळे केंद्र सरकारनं दिलेले आश्वासन पाळलं आहे.
गहू
गव्हाची किंमत प्रति क्विंटल १०५ रूपयांनी वाढणार आहे. याआधी एक क्विंटल गव्हाला १७३५ रुपये इतकी आधारभूत किंमत दिली जात होती. ती आता १८४० रुपये करण्यात आली आहे.
हरभरा
४४४० रुपये प्रति क्विंटल असणारा हरभरा आता ४६२० रूपये प्रति क्विंटल झाला आहे. मसूप डाळीची किंमत वाढून ४४७५ रूपये प्रति क्विंटल झाली आहे.
दरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना 62,635 कोटी रुपये जास्त मिळणार आहेत. उत्पादनखर्चाच्या 50 टक्के जास्त रक्कम शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत वाढवल्यामुळे मिळणार असून त्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे देशभरातील शेतक-यांना याचा फायदा होणार आहे.
COMMENTS