नवी दिल्ली – आगामी निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारनं देशातील शेतक-यांना खूश करण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्र सरकारनं निवडणूक जाहीरनाम्यामध्ये शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार सत्तेवर आल्यानंतर तब्बल सव्वाचार वर्षांनी शेतीमालाला दीडपट भाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खरीपांच्या पिकांचे सोयाबीन, तूर, कापसाचे नवीन खरेदी किंमत जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये सरकारने खरीप पिकांवर एमएसपी २०० रूपयांनी वाढविली असून केंद्रीय मंत्रिमंडळातील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे एमएसपी १५५० वरून १७५० प्रति क्विंटल करण्यात आली आहे. मागील वर्षी ८० रूपये एमएसपी वाढविली होती.
पूर्वीचे वर्षाचे दर – आत्ताचे दर
मका – १४२५ वरून १७००
तूरडाळ – ५४५० वरून ५६७५
उडद – ५४०० वरून ५६००
ज्वार – १७२५ वरून २३४०
बाजरी – १४२५ वरून १९५०
मुंगडाळ – ५५७५ वरून ६९७५
सोयाबीन – ३०५० वरून ३३९९
तीळ – ५३०० वरून ६४२९
सुर्यफूल – ४१०० वरून ५३८८
शेंगदाणे – ४४५० वरून ४८९०
(कापूस) कॉटन लाँग स्टेपल – ४३२० – ५४५०
(कापूस) काँटन लाँग स्टेपल – ४३२० – ५४५०
दरम्यान केंद्र सरकारनं घेतलेल्या या निर्णयामुळे देशभरातील शेतक-यांना मोठा फायदा होणार आहे. परंतु सरकारनं जरी हा निर्णय घेतला असला तरी शेतक-यांच्या मालाची खरेदी वेळेवर होत नाही. त्यामुळे अनेक शेतक-यांना याचा फायदा होत नाही. त्यामुळे याच्यावर काहीतरी सरकारकडून उपाय काढणं गरजेचं आहे. तसेच केंद्र सरकारनं निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी कार्डाचा फायदा मिळवण्यासाठी हे दर वाढवले असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. त्यामुळे या शेतकरी कार्डाचा फायदा भाजपला कितपत होणार हे आमागी निवडणुकीनंतरच समजणार आहे.
COMMENTS