राज्यातील कांदा उत्पादक शेतक-यांना केंद्र सरकारकडून दिलासा !

राज्यातील कांदा उत्पादक शेतक-यांना केंद्र सरकारकडून दिलासा !

नाशिक – राज्यातील कांदा उत्पादक शेतक-यांना केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. कांद्यावरील किमान निर्यात मुल्य दरात १५० डॉलरने घट करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला असून लासलगाव बाजार समितीच्या शिष्टमंडळाने हे दर कमी करण्याची मागणी केली होती.

दरम्यान यापूर्वी कांद्यावरील निर्यात मुल्य 850 डॉलर होते. त्यामुळे कांदा उत्पादक शेतक-यांचे जास्त पैसे निर्यातीमध्ये जात होते. सतत घसरणारे कांद्याचे दर आणि निर्यातमुल्यामुळे कांदा उत्पादक शेत-यांच्या पदरात निराशाच पडत होती. त्यामुळे लासलगाव बाजार समितीच्या शिष्टमंडळाने गेली काही महिन्यांपासून हे दर कमी करण्याची मागणी सरकारकडे केली होती. याबाबत केंद्र सरकारनं अखेर निर्यातीवरील मुल्य कमी केले असल्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

COMMENTS