नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प सादर करण्यास सुरूवात केली आहे.अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. गेल्या पाच वर्षात नव्या भारतासाठी आम्ही काम केलं, देशातील सर्वात शेवटच्या लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो असल्याचं संसदेत निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे.
अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे
उजाला योजनेअंतर्गत ३५ कोटी एलईडी बल्बचे वाटप, १८ हजार कोटींहून अधिक रुपये वाचले
प्रधानमंत्री सहयोगी मानधन योजनेद्वारे कामगारांना पेन्शन देणार
देशाच्या विकासात महिलांचे मोठे योगदान, ‘नारी टू नारायणी’ महिलांच्या विकासासाठी मोदी सरकारचा नवा नारा
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या अंतर्गत पुढच्या पाच वर्षांमध्ये सव्वा लाख किलोमीटरचे रस्ते बांधणार. त्यासाठी 80 हजार 250 कोटी रुपयांची तरतूद
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या अंतर्गत पुढच्या पाच वर्षांमध्ये सव्वा लाख किलोमीटरचे रस्ते बांधणार. त्यासाठी 80 हजार 250 कोटी रुपयांची तरतूद
२०२४ पर्यंत देशातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठा, हर घर नल, हर घर पाणी योजना राबविणार
अन्नदात्याला ऊर्जादाता करणार, झिरो बजट शेतीसाठी प्रोत्साहन देणार
डाळींबाबत आपण स्वयंपूर्ण होऊ, मासेमारी देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्वपूर्ण मासेमारीसाठी महत्वकांक्षी योजना आणणार, त्यांना साहाय्य करणार
देशात २०२२ पर्यंत १.९५ कोटी घरं बांधणार, प्रत्येक घराला वीज, गॅस, शौचालय देणार
प्रधानमंत्री कर्मयोगी योजनेच्या अंतर्गत 59 मिनिटात एक कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध केलं जाईल
इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणार, इलेक्ट्रिक वाहनांच्या विकासावर भर देणार
रेल्वेसाठी ५० लाख कोटींची गरज, यातून रेल्वेचा पायाभूत विकास शक्य होणार
तरुणांच्या हाताला काम देण्याचा सरकारचा प्रयत्न , मोदींच्या नेतृत्वात देश प्रगतीपथावर पोहोचला
वीज पुरविण्यासाठी वन नेशन वन ग्रीड, प्रत्येकाला वीज देण्यात यश, राज्य सरकारला सोबत घेऊन वीज निर्मिती
भाडे करारासाठी नवी योजना आणणार, प्रत्येकाला घर मिळावे यासाठी प्रयत्नशील
तरुणांना उद्योगासाठी त्वरित कर्ज उपलब्ध करून देणार, लघु, मध्यम उद्योगांना उभारी देणार, ५९ मिनिटात तरुणांना देणार कर्ज
प्रधानमंत्री कर्मयोगी योजनेच्या अंतर्गत 59 मिनिटात एक कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध केलं जाईल
अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात मोठा उत्साह पाहायला मिळला. बाजार सुरु होताच सेन्सेक्स 119 अंशांनी वधारुन 40 हजार 27 अंकांवर पोहचला होता.
अर्थसंकल्प सादर करण्यासाठी ११ वाजताचीच वेळ का?
ब्रिटिशांच्या काळापासून संध्याकाळी पाच वाजता अर्थसंकल्प सादर करण्याची प्रथा होती. मात्र २००१ मध्ये यशवंत सिन्हा यांनी ही परंपरा बदलून ११ वाजता अर्थसंकल्प सादर करण्याची नवी परंपरा सुरू केली. त्यावेळी देशात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीए सरकार होतं. तेव्हापासून ही परंपरा सुरु झाली आहे.
याआधी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अर्थसंकल्प सादर केला होता. देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री होण्याचा मान १९७०-७१ मध्ये इंदिरा गांधी यांच्याकडे गेला असला, तरी अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारामन या पहिल्या महिला अर्थमंत्री ठरल्या आहेत. कारण इंदिरा गांधी पूर्णवेळ अर्थमंत्री नव्हत्या. १९७०-७१मध्ये इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान असताना अर्थ खातं त्यांच्याकडे ठेवलं होतं. मात्र सीतारामन या खऱ्या अर्थाने पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री ठरल्या आहेत.
COMMENTS