मराठवाड्यातील नुकसानीची केंद्रीय पथकातर्फे पाहणी

मराठवाड्यातील नुकसानीची केंद्रीय पथकातर्फे पाहणी

उस्मानाबाद – मराठवाडा विभागातील औरंगाबाद व उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांची
केंद्र शासनाच्या सहा अधिकाऱ्यांच्या पथकाने पाहणी दौरा सुरू केला. अतिवृष्टीमुळे मराठवाडा विभागातील सर्वाधिक २६ लाख हेक्टरचे नुकसान झाले आहे. त्यामुळे केंद्राकडून निधी मिळावा यासाठी एनडीआरएफचे पथक राज्यात नुकसानीची पाहणी करणार आहे.
रमेश गंता यांच्या नेतृत्वाखाली आर. बी. कौल, ग्रामीण विकास विभागाचे उपसचिव यश पाल, आर. पी. सिंग, तुषार व्यास, एम. एस. सहारे यांच्या उपस्थितीत पाहणी केली जाणार आहे. या पाहणी दौऱ्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ८ आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील ७ गावांमध्ये दोन पथकांच्या माध्यमातून पाहणी करण्यात येणार आहे. दरम्यान अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक दाखल झालेले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील निपाणी या गावात पथक पाहणी केली.

यामध्ये एक पथक उस्मानाबाद, तर एक पथक औरंगाबाद जिल्ह्यात पाहणी करणार आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात निपाणी, पिंपळगाव, पैठण तालुक्यातील गाझीपूर निलजगाव, शेकटा, गंगापूर तालुक्यातील मुरमी, ढोरगाव, वारखेड या गावात एक पथक जाईल, तर उस्मानाबाद जिल्ह्यात केशगाव, पाटोदा, लोहारा तालुक्यातील सास्तूर, राजेगाव, तुळजापूर तालुक्यातील कक्रांबा, अपसिंगा, कत्री या गावात दुसरे पथक पाहणी करणार आहे.

COMMENTS