सांगली – घरा-घरात जाऊन भेट वस्तू द्यायच्या, प्रत्येक कार्यकर्त्यांनी रोज सात घरं असे 15 दिवसात 200 घरांपर्यंत जायाचं आणि भेट वस्तू द्यायच्या असा अजब सल्ला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मतं मिळवण्यासाठी दिला आहे. तसेच प्लेक्स आणि वाढदिवस साजरे करून मत मिळत नसतात, पण बूथपर्यंत जाऊन कार्यकर्त्यांनी काम केले तर, मत पण मिळतात आणि आपलं काम जनतेपर्यंत पोहचतं असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान ‘भाजपचे काम संघटनात्मक आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजही एका बूथचे प्रमुख आहेत. बूथच्या माध्यमातून निवडणुकीला दिशा देण्याचा प्रयत्न केला जातो. आत्ता महपालिका निवडणुकीला जी बूथ रचना तयार केली जात आहे, ती पुढे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकी वेळी पण तीच रचना असणार असल्याचंही यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी म्हटलं आहे. सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरक्षेत्रात भाजपचं बूथ प्रमुख प्रशिक्षण शिबिर सांगलीत संपन्न झालं. त्यावेळी मार्गदर्शन करताना चंद्रकांत पाटील यांनी आपल्या आगामी निव़डणुका डोळ्यासमोर ठेवून हा सल्ला दिला आहे.
COMMENTS