छगन भुजबळांना तातडीने जसलोक रुग्णालयात केले दाखल !

छगन भुजबळांना तातडीने जसलोक रुग्णालयात केले दाखल !

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते छगन भुजबळ यांना तातडीने जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भुजबळ हे न्यायलयात जात असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान आज पीएमएलए कोर्टात जात असताना भुजबळ यांच्या छातीत दुखू लागले, शिवाय त्यांना श्वसनाचाही त्रास होऊ लागला. यामुळे त्यांना जसलोक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
तसेच  पुढील उपचारांसाठी त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

COMMENTS