समीर भुजबळमुळेच माझ्यावर ही वेळ – छगन भुजबळ

समीर भुजबळमुळेच माझ्यावर ही वेळ – छगन भुजबळ

मुंबई – भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली गेली अनेक दिवसांपासून छगन भुजबळ हे तुरुंगात आहेत. परंतु माझ्यावर तुरुंगात जाण्याची वेळ पुतण्या समिर भुजबळमुळेच आली असल्याचं वक्तव्य स्वतः छगन भुजबळ यांनी केलं असल्याची माहिती आहे. याबाबतची बातमी दैनिक सकाळनं दिली असून काही दिवसांपूर्वी खटल्याच्या सुनावणीनिमित्त छगन भुजबळ व समीर भुजबळ यांना न्यायालयात आणण्यात आले होते. न्यायालयीन कामकाज सुरू होण्यापूर्वी फावल्या वेळात समीर अचानक दिसल्यामुळे भुजबळ यांनी आपल्या मनातील भावनांना मोकळी वाट करून दिली व त्याला माझ्यासमोर आणू नका असं त्यांनी म्हटलं होतं.

दरम्यान काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री इत्यादी खात्यांचे मंत्री म्हणून काम पाहिलं आहे. त्या काळात समीर भुजबळ हे छगन भुजबळ यांचे प्रतीमंत्री म्हणून काम पाहत होते. त्यावेळी समिर भुजबळ यांनी अर्थपूर्ण कामांमध्ये भ्रष्टाचार केला. यामध्ये समिर भुजबळ स्वतःही अडकले आणि संबंधित खात्याचे मंत्री असलेले छगन भुजबळही अडकले. दोघंही काका-पुतणे तरुंगात आहेत. यावरुन छगन भुजबळ हे आपले पुतणे समिर भुजबळांवर नाराज असल्याचं दिसून येत आहे. त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

 

 

COMMENTS