शरद पवार यांनी निवडणूक लढवावी का ?, छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया !

शरद पवार यांनी निवडणूक लढवावी का ?, छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया !

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार हे आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. ते पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा सुरु होती. परंतु याबाबत आज निवडणूक लढवण्याबाबतची पवारांची भूमिका राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केली आहे. पवार साहेब हे महाराष्ट्रातून कोणतीही लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं आव्हाड यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मागील निवडणुकीप्रमाणेच शरद पवार याही निवडणुकीच्या मैदानात उतरणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

दरम्यान शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक लढवावी का असा सवाल राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना राष्टावादी काँग्रेसची लोकसभा आढावा बैठक संपल्यानंतर विचारण्यात आला. यावर भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली असून पवार यांनी मोठया पदावर जावं, हीच माझी इच्छा आहे.  मला खूप वाटते पवार साहेबांनी मोठ्या पदावर जावं असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान याच बैठकीमध्ये कोल्हापूरमध्ये धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीला स्थानिक नगरसेवक आणि जिल्ह्यातील नेत्यांनी विरोध केला आहे. धनंजय महाडिक यांची पक्षविरोधी भूमिका आणि भाजपशी जवळीक या मुद्द्यावरून हसन मुश्रीफ गोटातून जोरदार विरोध करण्यात आला आहे. तसेच याठिकाणी दुसरा उमेदवार देण्याची मागणी स्थानिक नेत्यांनी केली आहे. त्यामुळे या नेत्यांची मागणी पक्षश्रेष्ठी मान्य करणार का याकडे लक्ष लागलं आहे.

 

 

COMMENTS