मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर करण्यात येणाय्रा ईडीच्या कारवाईबाबत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ईडीचा देशात दुरुपयोग सुरू आहे असं म्हणायला वाव आहे.अतिरेक्यांवर जरब बसावी म्हणून हा कायदा जगभर करण्यात आला. आपण तो अधिक कडक केला. भ्रष्टाचाराचे आरोप आहेत तेही अतिरेकी गणले जाऊ लागले. ही सुधारणा पी. चिदंबरम यांनी केली.
गुन्हा केला की नाही हे त्या गुन्हेगाराने सिद्ध करायचे असा हा विचित्र कायदा आहे, इतर गुन्ह्यात पोलीस तपास करून गुन्हेगार आहे की नाही हे सिद्ध करतात असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.
तसेच हे कायदे बनवताना आणि वापरताना आपण कायम त्या गादीवर बसलेलो नाही. कुणाच्याही हातात हे शस्त्र जाऊ शकतं आणि ही दुधारी तलवार ती वेगळ्या पद्धतीने वापरता येईल. या देशातील राजकीय पक्षांनी या कायद्यातील राक्षसी तरतुदी आहेत त्यात सुधारणा केली पाहिजे. आज विरोधकांवर वेळ आली आहे उद्या दुस-यावर येईल. हे लोकशाहीला योग्य नाही. पवारांवर असा गुन्हा दाखल करणं याचा सगळ्यांनी निषेध करायला हवा. ज्यांचा त्या बँकेशी काहीही संबंध नाही. बँकेत संचालक झाले नाहीत, कधी कुणाला आदेश दिले नाहीत.त्यामुळे पवारा़ंवरील गुन्ह्याचा निषेध राज्यातील सर्व जनतेने केला पाहिजे, महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीने केला पाहिजे मग तो कोणत्याही पक्षाचा असो विरोधकांचं तोंड बंद करण्यासाठी हे शस्त्र वापरलं जातं असल्याचा आरोपही भुजबळ यांनी केला आहे.
COMMENTS