नाशिक – आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मोठी घोषणा केली आहे. आपण कोणत्याही पक्षात जाणार नसून राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं स्पष्टीकरण भुजबळ यांनी दिलं आहे. तसेच आपण येवला मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार असल्याचंही भुजबळ यांनी जाहीर केलं आहे.
निवडणुकांचे निकाल दोन दिवसांनंतर का ? ईव्हीएममध्ये गडबड करायला का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. ईव्हीएम मॅनेज करण्यासाठीच निकाल 2 दिवस लांबवले जातायत असा आरोपही भुजबळांनी केला आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ हे शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. भुजबळ येवल्यातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढविणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. परंतु मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे आणि राष्ट्रवादी पक्षाकडूनच येवला मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे छगन भुजबळ यांनी जाहीर केले आहे. तसेच विकासाच्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढवणार असून आपल्यासमोर कोणाचेही आव्हान नाही, जे आहे ते शून्य असल्याचे भुजबळ यांनी सांगून त्यांना आव्हान देणारे राष्ट्रवादीचे नेते माणिकराव शिंदे यांना उत्तर दिले होते.
COMMENTS