भुजबळांची तांत्रिक सुटका, जामिनाची सर्व कायदेशीर प्रकिया पोलीसांकडून पूर्ण !

भुजबळांची तांत्रिक सुटका, जामिनाची सर्व कायदेशीर प्रकिया पोलीसांकडून पूर्ण !

मुंबई – छगन भुजबळ यांची तांत्रिक सुटका झाली असून त्यांच्या जामिनाची सर्व कायदेशीर प्रकिया पोलिसांनी आजच पूर्ण केली आहे. परंतु छगन भुजबळ यांचा मुक्काम अजून ४ ते ५ दिवस केईएम रुग्णालयातच असणार आहे. शुक्रवारी जामीन मिळाल्यानंतर सलग दोन दिवस सुट्ट्या असल्यामुळे भुजबळ यांची सुटका होऊ शकली नाही. उद्या दुपारनंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर भुजबळ यांची सुटका होणार आहे. सध्या प्रकृती ठिक नसल्याने भुजबळांवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भुजबळ केईएममध्येच उपचार घेणार आहेत. त्यानंतर त्यांना खाजगी रुग्णालयात हलवलं जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान जामीन मिळाल्यानंतर भुजबळ केईएम रुग्णालयात बाहेर येतील आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधतील अशी चर्चा सुरू होती. मात्र प्रकृतीच्या कारणांमुळे सध्या तरी भुजबळ कोणत्याही जाहीर कार्यक्रमात जाणार नसून चांगले उपचार घेणे ही त्यांची प्राथमिकता असल्याचे सांगितले जात आहे.

COMMENTS