राज्यातील विविध विकास महामंडळातील अध्यक्षपदाच्या नियुक्त्या – चंद्रकांत पाटील

राज्यातील विविध विकास महामंडळातील अध्यक्षपदाच्या नियुक्त्या – चंद्रकांत पाटील

मुंबई – राज्यातील विकास महामंडळातील अध्यक्षपदांची नियुक्ती केली असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. विदर्भ विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी चैनसुख संचेती तर उर्वरित महाराष्ट्र विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. योगेश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी आमदार डॉ. सुनील देशमुख आणि महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी खासदार संजयकाका पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान आज घेण्यात आलेल्या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली असून या महामंडळातील अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या जागा रिक्त झाल्या होत्या. त्यानंतर विदर्भ विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी चैनसुख संचेती तर उर्वरित महाराष्ट्र विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. योगेश जाधव तर विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी आमदार डॉ. सुनील देशमुख आणि महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी खासदार संजयकाका पाटील यांची वर्णी लागली आहे.

 

 

COMMENTS