चंदीगढ – पंजाबमधील कॅबिनेट मंत्री असलेले नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पत्नीने घेतलेल्या एका निर्णयामुळे राज्यातील काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांमध्ये अस्वस्थता पहायला मिळत आहे.आगामी लोकसभा निवडणुकीसाठी चंदीगढ मतदारसंघातून नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पत्नी डॉ. नवज्योत कौर सिद्धू यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे. चंदीगढ काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप छाबड़ा यांच्याकडे त्यांनी लेखी अर्ज देखील केला आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रबळ दावेदार असलेल्या माजी केंद्रीय मंत्री पवन बंसल आणि मनीष तिवारी यांच्यामध्ये अस्वस्थता पसरली आहे.
दरम्यान लोकसभेसाठी पवन बंसल यांच्या नावावर स्थानिक नेत्यांनी संमती दर्शवली आहे. याबाबतचा प्रस्ताव देखील पाठवला जाणार होता. परंतु अशातच डॉ. सिद्धू यांनीच बंसल यांच्या नावाचा प्रस्ताव पाठविण्यावर आक्षेप घेतला आहे. तसेच त्यांनी चंदीगढमध्ये जनसंपर्क अभियान देखील सुरु केलं आहे. यामुळे बंसल गटामध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून माजी केंद्रीय मंत्री मनोज तिवारी देखील तिकीटासाठी उत्सूक आहेत. त्यामुळे याठिकाणी आता उमेदवारी देण्यासाठी काँग्रेससमोर मोठा पेच निर्माण झाला असल्याचं दिसत आहे.
COMMENTS