औरंगाबाद – गंगापूर तालुक्यातील काकासाहेब शिंदे यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी राज्यभरातील मराठा बांधवांनी हजेरी लावली होती. तसेच त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी काही राजकीय नेत्यांनीही हजेरी लावण्याचा प्रयत्न केला. शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे हे देखील याठिकाणी गेले परंतु त्यांना लगेच परतीचं पाऊल उचलावं लागलं. कारण संतप्त स्थानिकांनी त्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. जमावाने खैरेंविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.
दरम्यान शिंदे कुटुंबियांना १० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून तसेच त्यांच्या भावालाही नोकरी देण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाने दिले आहे. परंतु काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूनंतर राज्यभरात तणावाचं वातावरण असून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी बंदचे परिणात जाणवत असून मराठवाड्यात शाळा कॉलेज बंद ठेवण्यात आले आहेत.
COMMENTS