पराभवानंतर चंद्रकांत खैरेंचं वादग्रस्त वक्तव्य !

पराभवानंतर चंद्रकांत खैरेंचं वादग्रस्त वक्तव्य !

मुंबई – औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा दारूण पराभव झाला आहे. त्यामुळे शिवसेनेचा हा गड तब्बल 20 वर्षांनी खालसा झाला आहे. वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील यांनी चंद्रकांत खैरे यांना पराभवाची धूळ चारली. त्यामुळे शिवसेनेचे उपनेते चंद्रकांत खैरे यांना हा पराभव चांगलाच जिव्हारी लागला आहे. या पराभवामुळे खैरे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. विजयी उमेदवार इम्तियाज जलील आणि विरोधकांना सोडणार नाही,’ असे खैरेंनी म्हटलं आहे.

दरम्यान वंचित बहुजन आघाडी, काँग्रेसमधले अंतर्गत मतभेद आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे चंद्रकांत खैरेंचा पराभव झाला असल्याचं बोललं जात आहे. पराभवानंतर खैरेंनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची शुक्रवारी ‘मातोश्री’वर भेट घेतली. आपला पराभव का आणि कसा झाला, याचा अहवाल त्यांनी दिला. त्यानंतर त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ‘विजयी उमेदवार इम्तियाज जलील आणि विरोधकांना सोडणार नसल्याचं खैरेंनी म्हटलं आहे. खैरे यांच्या वक्तव्यावर आता वंचित बहूजन आघाडीचे नवनिर्वाचीत खासदार इम्तियाज जलील काय उत्तर देणार हे पाहण गरजेचं आहे.

1998 ची लोकसभा निवडणूक सोडली तर शिवसेना इथे 1989 पासून 2014 पर्यंतच्या निवडणुकांमध्ये आपलं वर्चस्व राखून आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेमुळे भाजप शिवसेना युतीने काँग्रेसवर जोरदार मात केली होती. परंतु या निवडणुकीत मात्र शिवसेनेला धक्का बसला आहे. वंचित बहुजन आघाडी, काँग्रेसमधले अंतर्गत मतभेद आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे मतामध्ये विभाजन झाले आणि याचा फटका खैरे यांना बसला आहे.

COMMENTS