चंद्रकांत पाटील यांच्या संपत्तीची ईडीमार्फत चौकशी करा; शिवसेनेची मागणी

चंद्रकांत पाटील यांच्या संपत्तीची ईडीमार्फत चौकशी करा; शिवसेनेची मागणी

कोल्हापूर –  शिवसेनेचे कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी महसूल मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महसूल आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचा गैरवापर करत अमाप संपत्ती मिळवली असल्याचा गंभीर आरोप केला. ईडी मार्फत चंद्रकांत पाटील यांच्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी अशी मागणी क्षीरसागर यांनी केली. 

याबाबत राजेश क्षीरसागर म्हणाले, 2014 मध्ये चंद्रकांतदादा पाटील आमदार होते त्यावेळची संपत्ती आणि सध्याची संपत्ती यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. याची प्रमुख उदाहरणे म्हणजे गणेशोत्सव, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्राम पंचायत निवडणुकांमध्ये विरोधी पक्षाच्या उमेदवारांची केलेली खरेदी आहे. चंद्रकांतदादांची 2014पर्यंत टेलिमॅटीक कंपनी कमी प्रमाणात फायद्यात होती. त्यांनी आताच्या घडीला कोट्यवधीची संपत्ती कमावली आहे. या कंपनीची काही गुंतवणूक त्यांनी परदेशात केली आसल्यामुळे याबाबतची चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच मोठ्या प्रमाणात सार्वजनिक बांधकाम खात्यात बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाला आहे. अनेक सहकाऱ्यांच्या नावे त्यांनी पैसे ठेवले आहेत. मंत्रिपदाच्या शपथेचा त्यांनी भंग केला आहे. ईडीने या सर्वाची चौकशी करावी, असे क्षीरसागर म्हणाले आहेत.

 

COMMENTS