चंद्रकांत पाटील आणि दीपक सावंत यांना कर्जमाफी!

चंद्रकांत पाटील आणि दीपक सावंत यांना कर्जमाफी!

मुंबई – मुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत आज मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहात कर्जमाफी कार्यक्रम घेण्यात आला.‘आपले सरकार’ या वेबसाईटवरील लाभार्थ्यांच्या नावांच्या यादीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण यावेळी करण्यात आले.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम आजपासून त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पाहिल्या टप्प्यात 10 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळेल, असा दावा सरकारने केला आहे. यावेळी शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या कर्जमाफीचे प्रमाणपत्र चंद्रकांत पाटील आणि दीपक सावंत अशा दोन शेतकऱ्यांना कर्जमाफीचे नावे घेण्यात आले. त्यामुळे मंत्र्यांचे नावात साधर्म्य असलेल्या शेतकऱ्यांची नाव त्यातही एकामागून एक नाव ऐकताच मुख्यमंत्री आणि व्यासपीठावर उपस्थितसह हसू आवरेनास झाले.

COMMENTS