पुणे – मूळचे कोल्हापूरच्या असलेल्या पण पुण्यातील कोथरुड मतदारसंघातून निवडणून आलेल्या भाजपच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी मी पुन्हा कोल्हापूरला परत जाईन, असे वक्तव्य केल्यानंतर त्याची विविध नेत्यांनी खिल्ली उडवल्यानंतर आज चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्राने मला सहजासहजी पाठवलं नाही, माझं जे मिशन आहे ते पूर्ण झाल्याशिवाय जाणार नाही, असे सांगून घुमजाव केला.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “माणसाला आयुष्याच्या शेवटी कुठेतरी सेटल व्हायचं असतं. त्यावर मी म्हटलं की पुणं खूप चांगलं आहे. पण मी मिशन पूर्ण झाल्यानंतर माझ्या कोल्हापूरला जाईल. त्यासाठी 5, 15 किंवा 20 वर्षे असा कितीही वेळ लागू शकतो,” “माझ्या कोल्हापूरमध्ये परतण्याच्या वक्तव्यावर बरीच उलटसुलट चर्चा झाली. त्यामुळेच मला आज ही पत्रकार परिषद घ्यावी लागली. माझ्या त्या वक्तव्याने कुणी हुरळून जाऊ नये किंवा घाबरुनही जाऊ नये. मला ते बोलताना इतकी चर्चा होईल असं वाटलं नाही. माझं वाक्य असं होतं की केंद्राने मला दिलेलं मिशन पूर्ण होत नाही तोपर्यंत मी कुठेही जात नाही. केंद्राने मला सहजासहजी असंच पुण्यात पाठवलेलं नाही., असेही पाटील यांनी स्पष्ट केले,
COMMENTS