जळगाव – ईव्हीएम काँग्रेसनेच आणलं. चार राज्यात भाजपचा पराभव झाला तेव्हा यांना ईव्हीएम चालले. पण भाजपचा विजय झाला की ईव्हीएममध्ये गडबड असल्याचे सांगितले जाते हे कसं शक्य आहे असं वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
तसेच शरद पवारांनी सर्व गोष्टींचे जपून विश्लेषण करावे. सर्व विश्लेषण त्यांच्या अंगाशी येत आहेत. पवार कुटुंबातील एकही उमेदवार निवडून येणार नाही, हे मी ठामपणे सांगतो असा विश्वासही चंद्रकांत पाटील यांनी वर्तवला आहे.
दरम्यान बारामतीची जागा भाजपने जिंकली तर लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास उडेल, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. यावरुन शरद पवार यांना बारामतीतल्या पराभवाची चाहूल लागली असल्याचा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिनानिमित्त जळगाव जिल्ह्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात ते बोलत होते.
COMMENTS